टिम काथ्याकूट – अमरीश पुरी हे बॉलीवूडचे महाखलनायक आहेत. त्यांनी त्यांच्या आवाजाने चित्रपटांमधील खलनायकाला घरोघरी पोहोचवले.
अमरीश पुरी यांच्या दमदार अभिनयाने त्यांना बॉलीवूडसोबतच हॉलीवूडमध्ये देखील खलनायक म्हणून जागा निर्माण करुन दिली.
अमरीश पुरी यांनी वयाच्या चाळीसाव्या वर्षी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. त्यांचे संवाद आजही लोकांसाठी तेवढेच ताजे आहेत.
अमरीश पुरी यांनी केलेल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खलनायकासाठी भिती निर्माण करण्याचे काम केले.
शोलेमधल्या गब्बरनंतर अमरीश यांनी साकारलेल्या डॉनने लोकांच्या मनात भिती आणि प्रेम दोन्ही निर्माण केले.
कारण अमरीश पुरी जेवढे भयानक खलनायक होते. तेवढेच प्रेमाळू वडील देखील होते. त्यांनी साकारलेले प्रत्येक पात्र त्यांनी जिवंत केले.
अमरीश पुरी यांचा जन्म २२ जून १९३२ ला पंजाबमध्ये झाला. त्यांचे संपूर्ण नाव अमरीश लाला चंद होते. अमरीश पुरी यांना चार भाऊ आणि एक बहीण असे त्यांचे कुटूंब होते.
अमरीश पुरींचे मोठे भाऊ चवन पुरी आणि मदन पुरी हे अभिनय क्षेत्रात काम करत होते.
अमरीश पुरी यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पंजाबमधून पुर्ण केले होते. त्यानंतरचे शिक्षण त्यांनी शिमलाच्या कॉलेजमधून पुर्ण केले.
शिक्षण पुर्ण झाल्यानंतर ते मुंबईत आले अभिनेता बनण्यासाठी त्यांचे भाऊ मदन पुरी यांनी इंडस्ट्रीमध्ये चांगले नाव केले होते. पण त्यांनी अमरीश पुरी यांनी स्वत: स्ट्रगल करण्यासाठी सांगितले होते.
अमरीश पुरी यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात सरकारी नौकरी केली होती. ही नौकरी त्यांनी २१ वर्षांपर्यंत केली. त्यांनी नौकरीसोबतच नाटक देखील सुरु ठेवले. त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले आहे.
सत्यदेव दुबे यांच्या अनेक नाटकांमध्ये यांनी काम केले आहे. १९७९ मध्ये त्यांना ‘संगीत नाटक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नाटकासोबतच त्यांनी या काळात जाहीराती आणि चित्रपटांमध्ये छोट्या भुमिका निभावल्या. त्यांचा पहीला चित्रपट १९८२ चा मराठी भाषेतील ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे हा होता. प्रेम पुजारी हा त्यांचा हिंदीतील पहीला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी ‘रेशमा और शेरा’ हा चित्रपट केला.
त्यांनी अनके चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भुमिका केल्या. त्यानंतर १९८० मध्ये त्यांनी ‘हम पांच’ या चित्रपटात मुख्य खलनायकाची भुमिका केली. हा चित्रपट हिट झाला. त्याचबरोबर अमरीश पुरीदेखील चांगलेच हिट झाले होते.
त्यानंतर १९८१ मध्ये त्यांनी ‘विधाता’ चित्रपट केला. या चित्रपटात दिलीप कुमार संजय कपूर असे अनेक कलाकार होते. एवढे कलाकार असताना देखील अमरीश पुरी यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली.
१९८२ मध्ये त्यांनी परत दिलीप कुमारसोबत ‘शक्ति’ चित्रपटात काम केले. हा चित्रपट देखील हिट ठरला. १९८३ मध्ये ‘हिरो’ चित्रपट आला. या चित्रपटातील गाणी, संवाद, हिरा-हिरोईनबरोबरच या चित्रपटातील खलनायक ‘पाशा’ देखील तेवढाच हिट झाला. पाशाचा रोल अमरीश पुरी यांनी केला होता.
यानंतर ते बॉलीवूडचे नेहमीसाठीचे खलनायक बनले. यानंतर त्यांनी मागे न वळता अनेक चित्रपट केले. १९८९ ते १९९० या काळातील कोणताही चित्रपट पाहीला तर त्यात खलनायकाच्या भुमिकेत अमरीश पुरीच दिसतील.
अमरीश पुरी यांनी खलनायकांची भुमिका बदलली होती. त्यांचा भारदस्त आवाज त्यांना खलनायक बनण्यात मदत करत असत. त्यांच्या या जोरदार आवाजासाठी अमरीश पुरी रोज तीन तास संवादाता सराव करत असायचे.
१९८२ मध्ये त्यांनी ‘गांधी’ चित्रपटात खान यांची भुमिका निभावली होती. त्यानंतर अमरीश पुरी यांची चर्चा हॉलीवूदमध्ये देखील होऊ लागली होती. जुरॅसिक पार्क चित्रपटाचे दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग हे देखील अमरीश पुरी यांच्या अभिनयाने प्रभावित झाले होते.
स्टीवन स्पीलबर्ग यांनी ‘इंडीयाना जॉन्स अँड दे टेंम्पल ऑफ टून्स’ या चित्रपटासाची ऑफर त्यांनी अमरीश पुरी यांना दिली होती. या चित्रपटाच्या भुमिकेसाठी त्यांना अमरीश पुरी यांची स्क्रीन टेस्ट घ्यायची होती. त्यासाठी ते भारतात आले. त्यांनी ऑडीशन घेतले आणि अमरीश पुरी यांना ही भुमिका मिळाली.
१९८७ मध्ये ‘मिस्टर इंडीया’ चित्रपट आला. या चित्रपटात त्यांनी मोगॅमबोची भुमिका निभावली होती. त्यांची हा भुमिका त्यांनी आत्तापर्यंत निभावलेल्या सर्व भुमिकांपेक्षा वेगळी होती. या चित्रपटातील ‘मोगॅमबो खुश हुआ’ हा डायलॉग अजूनही तेवढाच प्रसिद्ध आहे.
अमरीश पुरी यांनी खलनायकांची प्रतिमा बदलली होती.त्यांनी फक्त खलनायक बनून लोकांची मने जिंकली नाहीत. त्यांची त्यांच्या अभियाच्या अनेक छटा दाखवल्या हो
आहेत.
त्यांनी प्रेमळ मित्राची भुमिका निभावली. त्यांनी एका वडीलांची भुमिका निभावली आहे. त्यांनी प्रत्येक एक भुमिकेत स्वत च्या अभिनयाने सर्वांना वेड लावले होते.
घातक, चाची 420, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, विरासत, करण अर्जून, घायल, तेहेलका, दामिनी, त्रीदेव, नायक, मेरी जंग, ऐतराज हे सर्व चित्रपट त्यांच्या अभिनयाने सजलेले आहेत. तसेच त्यांनी निशांत, भुमिका, मंथन, सुरज का सातवा घोडा हे चित्रपट देखील केले.
१९८० ते २००० या काळात हिंदी, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम, मराठी अशा अनेक भाषांमध्ये अमरीश पुरी यांनी ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अमरीश पुरी यांचे लग्न उर्मिला दिवेकर यांच्यासोबत झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. अमरीश पुरी चित्रपटांमध्ये जेवढे भयानक खलनायक होते. तेवढेच ते त्यांच्या वैयक्तिक आयूष्यात प्रेमळ होते.
बॉलीवूडच्या महाखलनायकाला ब्रेन हॅमर या आजाराने ग्रासले होते. या आजारामूळे १२ जानेवारी २००५ ला अमरीश पुरी यांचे निधन झाले. अमरीश पुरी यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देतो. २२ जून २०१९ ला गुगलने अमरीश पुरी यांना त्यांचे ‘डुडल’ बनवले. ही बॉलीवूडसाठी खुप मोठी गोष्ट आहे.
यांच्या निधनाने बॉलीवूडच्या खलनायकांचा एक काळ संपला होता. सध्या अमरीश पुरी यांचा नातू वर्धन पुरी बॉलीवडमध्ये स्ट्रगल करत आहे.