सकाळचा दिनक्रम, जॉब, घरची कामे, मुलांबरोबर खेळणे………… अश्या या सगळ्या कामातुन येणारा थकवा घालवण्याचा उपाय म्हणजे सगळ्याची आवडती झोप.
आता कोणाला झोप खुप लागते ही समस्या असते, तर कोणाला झोपच लागत नाही ही समस्या असते, आणि काहींना तर अंथरूणावर पडल्या पडल्या झोप लागते. पण आपण नक्की पुरेशी झोप घेतो का?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ८ तास झोप पुरेशी असते. आणि त्याचे आपल्याला अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊयात पुरेश्या झोपीचे फायदे.
१) ब्लड ग्लुकोज कमी होत नाही.
२) मुलांची आणि किशोरवयीनांची शारीरिक व मानसिक वाढ होते.
३)नवीन माहिती शिकणे आणि लक्षात ठेवणे सोपे जाते.
४) हार्मोन्स संतुलित राहतात आणि त्यामुळे पचनशक्ती सुधारून वजन नियंत्रणात राहते.
५) हृदय व रक्तवाहिनी निरोगी राहते.
६) रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
७) पुरेशी झोप न झाल्यामुळे वजन वाढते डिप्रेशन येतं, हृदयविकार व डायबेटीस होतो. शिवाय, झोप पूर्ण न झाल्यामुळे भयानक अपघातही होऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे.
८) पुरेशी झोप घेतल्याने तुमची कार्यक्षमता वाढते.
काय मग आता घेणार ना पुरेशी झोप? पुरेशी झोप घेत असाल तर ठीके पण जर घेत नसाल, तर आजपासुनच घ्या आणि स्वतःहा फरक अनुभवा.