• Home
Wednesday, April 14, 2021
  • Login
Kathyakut
  • Home
  • ताजेतवाने
  • राजकीय
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • इतिहास
  • शेती
  • खेळ
  • फॅक्ट चेक
  • किस्से
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताजेतवाने
  • राजकीय
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • इतिहास
  • शेती
  • खेळ
  • फॅक्ट चेक
  • किस्से
  • इतर
No Result
View All Result
Kathyakut
No Result
View All Result

सुशांत सिंग राजपूतसारखेच ‘या’ दक्षिणात्य अभिनेत्याने नैराश्यातून संपवले होते आयुष्य

OnkarJ by OnkarJ
November 12, 2020
in ताजेतवाने
0
सुशांत सिंग राजपूतसारखेच ‘या’ दक्षिणात्य अभिनेत्याने नैराश्यातून संपवले होते आयुष्य
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम काथ्याकूट – सुशांत सिंगच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. पण अजूनही खरे कारण समोर आले नाही.

बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांनी आत्महत्या केली आहे. पण आजही अनेकांचा मृत्यू रहस्य बनून राहीला आहे. फक्त बॉलीवूडचं नाही. तर दक्षिणात्या चित्रपटसृष्टीतही कलाकारांनी नैराश्यातून आत्महत्या केली आहे.

उदय किरण तेलगू चित्रपटांमधील अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले होते. पण २०१४ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी उदय किरणने आत्महत्या केली.

त्याच्या निधनाला सहा वर्ष उलटल्यानंतरही त्याचे चाहते त्याला विसरलेले नाहीत. सुशांत सिंग राजपूत आणि उदय करण यांच्यामध्ये साम्य होते. त्यामूळे सोशल मीडियावर त्याचे पुण्यस्मरण केले जात आहे.

उदय किरणचा जन्म २६ जून १९८० रोजी तेलगु भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला होता. वयाच्या विसाव्या वर्षी त्याने ‘नुवु नेनु’ या चित्रपटापासून टॉलीवूडमध्ये प्रवेश केला.

२००१ मध्ये त्याला चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (तेलगू) ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाला होता. चिरंजीवी हे उदय किरणला खुप सहकार्य करत होते.

उदयकडे चिरंजीवी यांनी त्यांची कन्या सुश्मिताशी लग्न करण्याचा प्रस्ताव आणला होता. २००३ मध्ये अभिनेता उदय किरणचा साखरपुडा अभिनेते चिरंजीवीची मुलगी सुष्मिताशी झाला. परंतु काही कारणाने साखरपुडा मोडला.

हा साखरपुडा मोडल्यामूळे उदय किरण खुप टेन्शनमध्ये होता. त्याच्या करीअरमध्येही या काळात अनेक अडचणी येत होत्या. त्याच्या हातून अनेक मोठे चित्रपट गेले होते.

त्यानंतर उदयने तेलुगुऐवजी तमिळ सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला जास्त यश मिळाले नाही. त्यानंतर जवळपास वर्षभर तो आर्थिक संकटात होता.

या गोष्टींमूळे उदय डिप्रेशनमध्ये होता. त्यानंतर त्याचे एका तरुणीसोबत ब्रेकअप झाले. त्यामुळे तो प्रचंड अस्वस्थ होता. तो तिच्या आठवणीत रडायचा. त्यानंतर २४ ऑक्टोबर २०१२ रोजी त्याने विशिताशी लग्न केले.

पण त्याच्या अडचणी कमी होत नव्हत्या. ५ जानेवारी २०१४ रोजी उदय किरणने आत्महत्या केली. पत्नी कामानिमित्त बाहेर गेली असताना. उदय किरणने गळफास घेऊन आयुष्य संपवले. त्यावेळी उदय किरण नैराश्यात असल्याचे बोलले जाते.

सुशांतच्या आणि उदय किरण यांच्या नैराश्याचे कारण थोडेफार सारखेच असल्याचे म्हटले जात आहे. दोघांनीही आत्महत्या केली.

दोघेही सेल्फमेड स्टार होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट नसले. तरी दोघांनीही डिप्रेशनमधून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

Tags: bollywoodkathyakutmarathi articleSouth superstarsuicideSushant singh rajput
Previous Post

८५ वर्षांच्या मेंढपाळाने बकऱ्या सांभाळत खोदले तब्बल १४ तलाव; सोबतच लावली २ हजार झाडे

Next Post

पंढरपूरच्या विठूरायाची मुर्ती तब्बल दहा ते पंधरा वर्षे पंढरपूरातून गायब होती; कारण..

तुम्हाला हे देखील आवडेल

‘करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक होते ‘हे’ क्रिकेटर, पण आता स्वतःचे पोट भरणेही झाले अवघड’
ताजेतवाने

‘करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक होते ‘हे’ क्रिकेटर, पण आता स्वतःचे पोट भरणेही झाले अवघड’

November 13, 2020
पंढरपूरच्या विठूरायाची मुर्ती तब्बल दहा ते पंधरा वर्षे पंढरपूरातून गायब होती; कारण..
ताजेतवाने

पंढरपूरच्या विठूरायाची मुर्ती तब्बल दहा ते पंधरा वर्षे पंढरपूरातून गायब होती; कारण..

November 12, 2020
८५ वर्षांच्या मेंढपाळाने बकऱ्या सांभाळत खोदले तब्बल १४ तलाव; सोबतच लावली २ हजार झाडे
ताजेतवाने

८५ वर्षांच्या मेंढपाळाने बकऱ्या सांभाळत खोदले तब्बल १४ तलाव; सोबतच लावली २ हजार झाडे

November 12, 2020
अभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर व्हिवीयन रिचर्डस यांची लव्ह स्टोरी
ताजेतवाने

अभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर व्हिवीयन रिचर्डस यांची लव्ह स्टोरी

November 11, 2020
स्वराज्य वाचवण्यासाठी पोटच्या गोळ्यासह शत्रुच्या छावनीत तब्बल १९ वर्षे कैदेत राहीलेली राणी येसुबाई
ताजेतवाने

स्वराज्य वाचवण्यासाठी पोटच्या गोळ्यासह शत्रुच्या छावनीत तब्बल १९ वर्षे कैदेत राहीलेली राणी येसुबाई

November 10, 2020
कहाणी बॉलीवूडच्या महाखलनायकाची; बॉलीवूडमध्ये आजही आहे त्यांच्या नावाची दहशत; वाचा सविस्तर
ताजेतवाने

कहाणी बॉलीवूडच्या महाखलनायकाची; बॉलीवूडमध्ये आजही आहे त्यांच्या नावाची दहशत; वाचा सविस्तर

November 10, 2020
Next Post
पंढरपूरच्या विठूरायाची मुर्ती तब्बल दहा ते पंधरा वर्षे पंढरपूरातून गायब होती; कारण..

पंढरपूरच्या विठूरायाची मुर्ती तब्बल दहा ते पंधरा वर्षे पंढरपूरातून गायब होती; कारण..

© 2020. Developed and Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • ताजेतवाने
  • राजकीय
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • इतिहास
  • शेती
  • खेळ
  • फॅक्ट चेक
  • किस्से
  • इतर

© 2020. Developed and Maintained by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In